Ad will apear here
Next
‘क्रेडाई’तर्फे शिखर परिषदेचे आयोजन
पुणे : क्रेडाई महाराष्ट्रने येत्या १९ आणि २० जानेवारीला हॉटेल हयात रिजन्सी येथे राष्ट्रीय शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. या वेळी ‘क्रेडाई’चे ५० शहरांतील २००हून अधिक सभासद यात सहभागी होणार आहेत.

या परिषदेत क्रेडाई नॅशनलचे चेअरमन गीतांबर आनंद, क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष जक्षय शहा, क्रेडाई नॅशनलचे प्रेसिडेंट इलेक्ट सतीश मगर, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, क्रेडाई नॅशनलचे सचिव रोहित राज मोदी, क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष बोमन इराणी उपस्थित राहणार आहेत.

शांतीलाल कटारियापहिल्या दिवशी ‘महारेरा’चे अध्यक्ष गौतम चटर्जी आणि नगर विकास विभागाचे संचालक एन. आर. शेंडे विकसकांना मार्गदर्शन करणार आहेत. समारोपाच्या दिवशी ‘क्रेडाई’चे प्रमुख सदस्य ‘क्रेडाई’च्या शहर संघटना ५० शहरांत पदार्पणानिमित्त एकत्र येणार आहेत.

‘शहर संघटनांना स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि तेथील सदस्यांमध्ये नेतृत्वगुण निर्माण करून त्यांना प्रभावी बनविण्याच्या उद्देशाने त्यांच्याशी संवाद साधणे हा यामागचा प्रमुख हेतू आहे,’ अशी माहिती शांतीलाल कटारिया यांनी दिली. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZTGBK
Similar Posts
‘क्रेडाई’कडून केरळला एक कोटी ३५ लाखांची मदत पुणे : केरळ पूरग्रस्तांसाठी क्रेडाई महाराष्ट्राच्या सर्व शहरांतील विकसकांनी एकत्र येऊन सढळपणे मदतीचा हात पुढे केला असून, ‘क्रेडाई’चे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक कोटी ३५ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
‘क्रेडाई महाराष्ट्र’ची वार्षिक परिषद नाशिकला पुणे : क्रेडाई महाराष्ट्रातर्फे रात्फे ताफे १३ व १४ जुलै रोजी नाशिक येथील महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसला दोन दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे. ‘महारेरा’ अध्यक्ष गौतम चटर्जी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून, ही सहावी वार्षिक परिषद आहे. यात महाराष्ट्र राज्यातील ५१ शहरातून एक हजाराहून
‘क्रेडाई महाराष्ट्र’च्या अध्यक्षपदी राजीव परीख पुणे : ‘क्रेडाई महाराष्ट्र’ची निवडणूक पुण्यातील कॉनरॅड हॉटेल येथे नुकतीच झाली. यात ‘क्रेडाई महाराष्ट्र’च्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे राजीव परीख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व सभासदांनी एकमताने परीख यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी निवड केली. एक एप्रिलपासून त्यांनी पदभार स्वीकारला.
परवडणाऱ्या घरांच्या उभारणीसाठी ‘क्रेडाई’ सक्रीय पुणे : प्रधानमंत्री आवास योजना व परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी क्रेडाई महाराष्ट्र सक्रीय पाऊले उचलत आहे. मुंबई वगळता संपूर्ण राज्यात पाच लाखांहून अधिक घरांच्या निर्मितीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य क्रेडाईने समोर ठेवले आहे. याचाच आढावा घेण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया राज्यातील २५ शहरांमध्ये दौरा करणार आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language